Linked In Profile Search

About Me

I am kinda dreamy and this is one of the reason I can write stories. I strongly believe that life has many amazing things to give you and it depends on the perspective of an individual. I have a positive approach towards life and feels very fortunate to be a women, a daughter, a wife and a mother. I love writing though not regular. This is my own world and I enjoy this space where I can share and express my feelings ..my thoughts. Hope u enjoy reading..Dont forget to comment if you like any article or poem :)

Wednesday, June 27, 2012

काही चारोळ्या...

चारोळी

तुझ्या अंगणातली फुले वेचताना
काही  वाऱ्यांनी उडून गेली
काही पायदळी तुडवून गेली
तुझ्या अंगणातली फुले वेचताना
ओंजळ कधीच भरली नाही...
*****************************************

काही भावना शब्दांत मांडता येत नाहीत
त्या डोळ्यांनीच बोलून जातात
डोळ्यांमधील त्या भावना
मग आपली ह्रुदयाच समजून  घेतात
*****************************************

वाटत तिथे कोणीच नसावं 
फक्त तू आणि मीच बसावं
त्या क्षितिजावरून होणारा सूर्यास्ताला
डोळे भरून पाहावं
*****************************************

पुन्हा तू मेघ दाटून आले
पुन्हा तो पाऊस बरसला
काही थेंब आकाशातून
तर काही माझ्या डोळ्यातून सांडवून गेला

*****************************************

मला खूप काही सांगायचे आहे
जे शब्दांचा पलीकडचे आहे
जमीनीवरून दाखवायचे आहे पण
आकाशा पलीकडचे आहे

समजून घेणार असशील
तर दाखवानाही सार्थ  आहे
निभावणार नसशील नातं हे
तर जगनही व्यर्थ आहे 

*****************************************

आठवणीत माझ्या कधी तरी येऊन जा
प्रेमाचा ओलावा थोडा तरी देऊन जा
स्पर्शाने तुझ्या मला फुलवून जा
मात्र जाता जाता मलाही सोबत घेऊन जा
*****************************************

तुझ्याशी खूप काही बोलायचे राहिलं
अर्ध्या वाटेवर तुला सोडावे लागलं
वाटतं हि वाट पुन्हा तुझ्याकडे घेऊन यावी
हृदयाची गुपितं अलगत तुझ्यापुढे उघडावी
*****************************************

आठवतो तुला तो पाऊस
आपल्या त्या पहिल्या भेटीचा
चिंब चिंब भिजताना
फक्त एकमेकांना पाहायचा
*****************************************

पहिले प्रेम असतंच असं
विसरायचं म्हणलं  तरी पुन्हा पुन्हा आठवायचं
सगळं आयुष्य त्याला लपवूनच ठेवायचं
पुढे पुढे जातानाही मागे वळून पाहायचं      
*****************************************

बोलावं म्हणालं  तर ऐकायला कोणी नाही
लिहावं  म्हणालं  तर शब्दही साथ देत  नाही
एकटीच बसून मग मनाला समजावलं
जगायचं आता ....कारण मृत्युही मुक्ती देणार नाही
*****************************************

चंद्राविना चांदण्या त्या
जणू एकट्याच उरल्या आहेत 
त्याचाविना अस्तित्व आपलं
पुन्हा शोधतच राहिल्या आहेत

*****************************************

हळुवार चमकताना त्या चांदण्या
तुझ्या आठवणीं झोळीत देऊन गेल्या
आपल्या प्रेमाच्या साक्ष देता देता  
प्रेमाने माझं हृदय भरून गेल्या
*****************************************

No comments:

Post a Comment