अशीच एक रात्र असावी...फक्त चांदण्यांची
डोकावणाऱ्या चंद्राचा मंद प्रकाश पडावा
वारा हळूवार आपल्याला स्पर्श करावा
जणू त्याचा अस्तित्वाची जाणीव करून जावा....
अशीच एक रात्र असावी...जिथे कोणीच नसावं
तुझ्या मिठीत जाताना मी स्वतःलाच विसरावं...
माझ्या केसांसोबत तू उगीचच खेळावं
हळूच मग माझ्या मिठीत तूही सामावून जावं...
अशीच एक रात्र असावी...प्राजक्तांचा फुलांची
आपल्या प्रेमासोबत त्यांनीही फुलायाची...
सर्वत्र त्या फुलांचा सडा पडावा
आठवणीत मग त्यांचा सुवास दरवळत राहावा...
अश्याच एका रात्रीची मी वाट पाहत आहे
त्यांचा सहवासाने मला फुलायचे आहे...
चांदण्या रात्री,प्राजक्तांच्या फुलांनी नाहायचे आहे
अश्याच एका रात्रीची मी वाट पाहत आहे...

No comments:
Post a Comment